स्पर्धा परीक्षेच्या करिअर मार्गदर्शन मेळाव्यास प्रतिसाद   

पुणे : स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘डीईएस पुणे युनिव्हर्सिटी’ आणि ‘चाणक्य मंडल परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षेच्या करिअर (युपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची ओळख) मार्गदर्शन मेळाव्यास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
 
फर्ग्युसन कॉलेजच्या अँफिथिएटरमध्ये रविवारी सकाळी साडेअकरा वाजता हा मेळावा पार पडला. या सत्रात माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि रोहिणी गुट्टे यांनी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी डीईएस पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष रवींद्र आचार्य, गंगनाथ झा, डॉ. शीतल रुईकर, स्वप्नील मुंगळे उपस्थित होते. युपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची ओळख, तयारीची पावले, अभ्यासाचे योग्य तंत्र आणि दिशा याविषयी माहिती देण्यात आली.  

Related Articles